14-year-old girl got pregnant after being abused jalgaon crime News rak94 sakal media
पुणे

पुणे | मध्यरात्री तरुणीने दिली सिगारेटची ऑर्डर, डिलिव्हरी बॉयचं अश्लील वर्तन

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात होम डिलीव्हरी मागवल्यानंतर एका महिलेला पश्चातापाला सामोरं जावं लागलंय. उशीरा रात्री होम डिलिव्हरी घेताना संबंधित पीडितेला वाईट अनुभव आला. कोंढव्यात राहणाऱ्या तरुणीने मध्यरात्री सिगारेटचं पाकिट ऑर्डर केलं. (Woman Abused by Delivery Boy in Pune)

डंझो अॅपमार्फत तिने ही ऑर्डर प्लेस केली. यानंतर डिलिव्हरी बॉय पाकिट घेऊन आला. मात्र, ऑर्डर स्वीकारायला गेलेल्या तरुणीला आलेल्या अनुभवाने पुणे पोलीस देखील हैराण झाले. (Pune Crime News)

रात्री उशीरा डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीसमोर येत हस्तमैथुन करायला सुरुवात केली. कोंढव्यातील एका तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित ३० वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोगेंदर बिंद्रा (वय ४०) या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला.

कोंढव्यात राहणाऱ्या एका तरुणीने रात्री उशिरा डंझो अॅपद्वारे सिगारेटची ऑर्डर दिली. ही ऑर्डर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय पहाटे पावणेतीन वाजता या तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने बेल वाजवली आणि तरुणीने दरवाजा उघडला. यानंतर डिलिव्हरी बॉयने थेट तरुणीच्या समोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. तरुणीने तत्काळ पोलिसांना संपर्क साधत या प्रकरणाची माहिती दिली. कोंढवा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT