delivery boy killed his friend after an argument over a raincoat in narhe ​​Sinhagad Road  
पुणे

Pune Crime : भांडण मिटवायला बोलवलं अन्...; पुण्यात रेनकोटवरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने केला मित्राचाच खून

delivery boy killed his friend Pune Crime News : दोन डिलिव्हरी बॉयमध्ये किरकोळ कारणवावरून झालेला वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रोहित कणसे

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल एका पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता रेनकोटवरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोन डिलिव्हरी बॉयमध्ये किरकोळ कारणवावरून झालेला वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी सुरेश भिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे ही मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दोघे ही मूळचे बीड जिल्ह्यातील असून गेल्या एक महिन्यापासून दोघांची एकमेकांसोबत ओळख होती.

दरम्यान काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री १०.३० वाजता ते दोघे ही भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारेने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT