Delwadi Akshaya Tritiya Event sakal
पुणे

Delwadi Akshaya Tritiya Event : अन देलवडी येथे अवतरले देव- दानव

अक्षय तृतीया निमित्त ग्रामस्थांनी जोपासली २०० वर्षांची सोंगाची जुनी परंपरा

सकाळ वृत्तसेवा

- प्रकाश शेलार

खुटबाव - देलवडी, तालुका दौंड येथे अक्षय तृतीयानिमित्त सोंगांच्या निमित्ताने दैत्य-दानव अवतरले. गावातील १२ बलुतेदारांनी सोंगाची २०० वर्षाची परंपरा जोपासली. सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या या जगामध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या या पारंपरिक महोत्सवाला ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.

परिसरातील पारगाव, खुटबाव, राहू पिंपळगाव, वाळकी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. झाडूच्या सोंगाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शारजा, गणपती, दैत्य -भवानी,मणी- मल्ल अही-मही, मारुती, राम-लक्ष्मण, भैरवनाथ, जोगेश्वरी, त्राटीका, नारायण, वैदीण आदी सोंगे मुखवटे घालून नाचवण्यात आली. यावर्षी कालिका माता, खंडोबा देव ही नवीन सोंगे प्रथमच घेण्यात आली होती.

खंडोबाचे बैलगाडी मध्ये आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरामध्ये या सोंगाला दाद दिली. रज्जाक शेख व मोहन शिर्के यांचे आवगणी गायन, नारायण भालेराव यांचे झांजवादन, हसन शेख यांचा ताशा वादनाने ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

सोबत पारंपारिक वाद्यांचा निनाद व शोभेची दारू डोळ्याचे पारणे फेडले. कुंभार फळी व सुतार फळी या २ गटाच्या माध्यमातून' सरदारजीच्या करामती 'व कथा अकलेच्या कांद्याची या लघु नाटिका संपन्न झाल्या. पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांच्या वतीने कलावंतांना मानाचा विडा दिला.

या कलेला दाद म्हणून शेलार पाटील परिवाराच्या वतीने अन्नदान देण्यात येते. सोंगे सुरू होण्यापूर्वी रासाई देवीची मिरवणूक निघाली. यावेळी मारुती मंदिर ते शेलारवाडा येथे अनेक युवकांनी कुलदैवत रासाई देवीला खांद्यावर घेऊन ठेका धरला.हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी अनुभवला दैत्य भवानी युद्धाचा थरार-

या सोंगामध्ये दैत्य व भवानी यांचे युद्ध हा सर्वोच्च प्रसंग ग्रामस्थांसाठी पाहण्यालायक असतो. या वर्षी यावर्षी दैत्याचे सोंग नंदू भागवत यांनी तर भवानीचे सोंग राजेंद्र बंड यांनी साकारले होते. 'भले' या आवाजाच्या जयघोष मध्ये दैत्य-भवानी एकमेकांना भिडले. हा प्रसंग प्रेक्षकांनी उभे राहून आपल्या डोळ्यामध्ये साठवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT