apple
apple 
पुणे

सफरचंद, किवी, ड्रॅगनला मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बाजारात सध्या शिमला येथून सफरचंद, सोलापूर, सातारा, कराड आणि नगर येथून पपई; त माळशिरज, फलटण, सातारा, नगर येथून ड्रॅगन, न्यूझीलंड, इटली या देशांतून किवी फळांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही फळे आरोग्यासाठी चांगली असल्याने या फळांना मागणी वाढल्याची माहिती मार्केट यार्डातील अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात या फळांचे भाव आवाक्‍यात आहेत. मात्र, किरकोळ बाजारात या फळांच्या भावातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. राज्यातील उत्पादित क्षेत्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे पपईचे उत्पादन कमी निघाले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पपईची आवक कमी होत आहे. घाऊक बाजारात पपईला किलोस १५ ते ३० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये भाव मिळत आहे.

ड्रॅगन फळाला घाऊक बाजारात ५० ते १५० रुपये, आतून पांढरे असलेल्या ड्रॅगन फळाला ४० ते १०० भाव मिळत आहे; तर किरकोळ बाजारात ड्रॅगन फळाला (लाल) १२० ते १८० रुपये, पांढरे ८० ते १५० रुपये भाव मिळत आहे; तसेच इटलीतून येणाऱ्या किवीच्या बॉक्‍सला (८ ते १० किलोचा बॉक्‍स) घाऊक बाजारात १२०० ते १३०० रुपये; तर न्यूझीलंडमधून येणाऱ्या किवीच्या एका बॉक्‍सला १४०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे.  किरकोळ बाजारात तीन फळांच्या छोट्या बॉक्‍सला १०० रुपयेच भाव मिळत आहे, असे काची यांनी सांगितले. तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला येथून दररोज ५००० ते ६००० बॉक्‍स सफरचंदाची आवक होत आहे.

किरकोळ बाजारात सफरचंदाला प्रतवारीनुसार ७० ते १५० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे सफरचंदाचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT