ganesh.jpg 
पुणे

आळंदीकरांकडून गणरायाच्या विसर्जनाला घरातच पसंती पण...

विलास काटे

आळंदी (पुणे) : पालिकेच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सुरूवात केली. मात्र, तरीही पालिकेने प्रभाग स्तरावर स्वतंत्र हौद तयार करण्याची मागणी गणेश भक्तांकडून होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जनास पालिका प्रशासनाने बंदी केली. याचबरोबर नदीकडे येणा-या मार्गावर इंद्रायणी काठी जागोजागी बॅरिकेड्स लावले. नागरिकांनी घरातच पाण्याचा हौद तयार करून गणेश मूर्ती विसर्जन करावे. त्यानंतर पालिकेने नेमलेला ठेकेदार मुर्त्या गोळा करणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यांस नागरिकांनी समिंश्र प्रतिसाद दिला. यामध्ये पर्यावरणाविषयी जागृत नागरिकांनी घरामधेच ड्रम तसेच बादलीमध्ये पाणी भरून मूर्त्यांचे विसर्जन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

काही गणेशभक्तांनी अगोदरच शाडू मातीच्या मुर्त्या विकत घेतल्या होत्या. ठिकठिकाणी गल्ली बोळात नागरिक घरातच मूर्ती विसर्जन करत असल्याचे चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने आणि पालिकेने विसर्जनाचा पर्याय उपलब्ध करून न दिल्याने नागरिक प्रशासनाची नजर चुकवून नदीपात्रातच मूर्ती विसर्जन करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नागरिक मूर्तीदान आणि नदीपात्रात मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिसाद देत आहेत. मात्र, पालिकेकडून पर्यायी सोय नसल्याने नागरिकांची कुचंबणा झाली. आणखी दोन दिवस विसर्जनास असल्याने पालिकेने विसर्जनासाठी प्रभागनिहाय हौद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT