Demand for establishment of blood bank of blood donors on cooperative basis 
पुणे

सहकार तत्त्वावर रक्तदात्यांची रक्तपेढी स्थापन करण्याची मागणी!

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात सहकार तत्वावर आधारित रक्तदात्यांची रक्तपेढी सुरू करण्यात यावी अशी मागणी रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे म्हणाले, "कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज असल्याचे समाज माध्यमातून आढळून आले. सरकारी आणि खासगी रुग्णालयात रक्तपेढ्या असूनही रक्ताची कमतरता भासत आहे. तर बहुतांश वेळी रक्त पिशव्यांच्या किंमती अधिक असल्यानेही अडचणी निर्माण झाल्या. या कठीण काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील रुग्णांनासाठी रक्तपिशवीची दरवाढ कमी करण्यात यावी, तसेच रक्तदान प्रबोधन समिती शहर व राज्य पातळीवर स्थापन करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. यासाठी मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील रक्तदात्यांच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होईल. यासाठी सहकार तत्त्वावर रक्तदात्यांचे शहर आणि तालुका स्तरावर रक्तपेढी असायला हवी. त्याचबरोबर गरजू लोकांना कमी किमतीत रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही सरकारकडे या मागण्या केल्या असून सरकारने याची दखल घ्यावी असे शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT