BJP Yuva Morcha Sakal
पुणे

Pune News : पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यास अटक करण्याची मागणी; भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कोरेगाव पार्कमधील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यासह हॉटेलमालकास अटक करण्यात यावी, तसेच या भागातील अवैध धंदे बंद करावेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरेगाव पार्कमधील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यासह हॉटेलमालकास अटक करण्यात यावी, तसेच या भागातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १६) रात्री आंदोलन करण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा प्रदेशचे सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले.

कोरेगाव पार्क ॲनेक्स येथील हॅाटेल फ्रेक-सुपर क्लबसमोर रात्री झालेल्या या आंदोलनात युवा मोर्चा कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष आशिष सुर्वे, शहर सरचिटणीस ओंकार केदारी, राजू परदेशी, प्रदेश पदाधिकारी अनिकेत हरपुडे, रोनक शेट्टी, ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार रायकर, युवा वॅारियर्सचे अध्यक्ष प्रतीक गुजराथी, प्रतीक कुंजीर, प्रणय शिंदे, सुरेंद्र ठाकूर, नीलेश कांबळे, ओमकर धुमाळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात अवैध धंदे, पबमध्ये रात्रभर धिंगाणा सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत असून, शहरातील संस्कृती बिघडत आहे. याबाबत संबंधित पोलिसांना पत्र देऊनही कारवाई केली जात नाही.

पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु अद्याप अटक करण्यात आलेली नाही. जोपर्यंत हॅाटेल मालक आणि आरोपी जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत हॅाटेल बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT