पुणे

मंचरला वाढली 'हापूस'ची मागणी; भावही भिडले गगनाला

डी. के. वळसे-पाटील

मंचर : कोकणचा राजा हापूस आंबा मंचरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. सध्या २०० पेट्यांची दररोज मागणी असताना १०० आंब्यांच्या पेट्यांची आवक होत आहे. आंब्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सहा ते आठ डझन आंब्याच्या पेटीचे बाजारभाव तीन ते सात हजार रुपयापर्यंत गेले आहेत. दहा ते १२ दिवसांपूर्वी आंब्याच्या पेटीचे बाजारभाव अडीच ते पाच हजार रुपयापर्यंत खाली आले होते. गुढीपाडवा मंगळवार (ता. १३) पासून आंब्याचे बाजारभाव सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आंबा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

देवगड, रत्नागिरी  भागातून गेल्या १०० वर्षांपासून मल्हारराव बाबूराव कंपनीमार्फत मुंबई मंचर येथे हापूस आंब्याची विक्री केली जाते. या कंपनीने कोकण भागात आंब्याच्या बागा  बागायतदाराबरोबर करार पद्धतीच्या शेतीचा प्रकल्प राबविला आहे. मंचर येथे लहान मोठे ३० व आंबेगाव तालुक्यात  १०० ते १२५ आंबा विक्रेते आहेत. प्रामुख्याने हापूस आंबा विक्री करण्याचे काम केले जाते.

मल्हारराव  बाबुराव कंपनीचे संचालक सतीश बेंडे पाटील म्हणाले, ''निसर्ग  चक्रीवादळाचा फटका कोकणात आंब्याच्या बागांना बसला आहे. त्यामुळे ३० ते ३५ टक्के आंबा उत्पादनात घट झाली आहे. पहिल्या बाराचे आंबे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई-पुणे व मंचर बाजारपेठेत दाखल झाले होते. आंबे पेटीचा सुरुवतीला सरासरी बाजारभाव तीन ते आठ हजार रुपये पर्यंत होता. १७ ते २० मार्चपर्यंत पेटीचा बाजारभाव दोन ते पाच हजार रुपयापर्यंत खाली आला होता. अजून दर कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांची  होती. पण दुसऱ्या बाराच्या कैऱ्या लगडलेल्या असतानाच  हवेतील तापमानात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे कैऱ्या गळून  पडल्या आहेत. त्याचाही परिणाम आंबा आवकवर झाला आहे. मध्यम वर्गीय ग्राहकांना परवडतील अशा बाजारभावात गुढी पाडव्याला आंबे उपलब्ध होतील.''

घरी पाहुणे आल्यामुळे दोन आंब्याच्या पेट्या खरेदीसाठी मंचरला आलो होतो. पण आंबे शिल्लक नाहीत, असे विक्रेत्याने सांगितले. शनिवारी किंवा रविवारी आंबे मिळणार आहेत. तीन हजार रुपये पेटी या दरानुसार विक्रेत्याला अँडव्हान्स रक्कम देऊन बुकिंग केली आहे.-सचिन कानडे, ग्राहक कळंब (ता. आंबेगाव) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT