The demand of Immediate Assistance for Wanderers 
पुणे

भटक्‍या विमुक्तांना तत्काळ मदत करा : सुशांत माने 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरसचे जगावर आलेले संकट भयंकर महाकाय असे रूप धारण करत आहे. या संकटात सुरळीत सुरू असणारे जनजीवन विस्कळित झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी नागरिकांना संबोधित करत आहेत. परंतु सध्या भटक्‍या विमुक्तांचे राज्यभर हाल होताना दिसून येत आहेत. 


पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज दिवसभर कष्ट करून दोन वेळची रोजी रोटी भागवत होता. पण आता रोजी पण नाय आणि रोटी पण नाय, अशी वेळ आली आहे. लेकरं उपासमारीची शिकार बनत आहेत, भूकेच्या व्याकुळता वरून उन्हाचा तडाखा अशा संकटात समाज सापडला आहे. गावात धान्य वाटप सुरू आहे, अन्नदान सुरू आहे, पण भटक्‍या समाजाला गावात जागा मिळाली नाही, तो कायम गावाच्या वेशीवर टांगलेला समाज तिथपर्यंत हे धान्य पोचत नाही. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भटक्‍या विमुक्तांच्या 42 जातीकडे विशेषतः लक्ष घालावे. अन्नधान्याबरोबर वैद्यकीय सेवा म्हणजेच गावकूसवर राहणाऱ्या पाड्या, वस्त्या, माळरानावरचे पाल ठोकून राहणाऱ्या माणसाची आरोग्य तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी अखिल भारतीय कैकाडी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष सुशांत माने यांनी केली आहे. भटक्‍या विमुक्तांची दैनंदिनी सुरळीत राहण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून या संकटात टिकून राहण्यासाठी सरकारने एक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT