pashan sus road.jpg
pashan sus road.jpg 
पुणे

पाषाण- सूस खिंडीजवळील रस्त्यावर ना स्पीड ब्रेकर, ना पथदिवे

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : मुंबई- बंगळूर महामार्गावरील बाणेर जवळील पाषाण-सूस खिंड येथे पुलाचे काम सुरू असून हा पूल वाहतुकीस बंद करून ही वाहतूक वळवून जवळच्या  अंतर्गत रस्त्यावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हा वाढलेला असून, या रस्त्यावर उतार जास्त असल्यामुळे वाहनांचा वेग खूप जास्त असतो, त्यामुळे महिना भरात इथे 3 अपघात झाले आहेत. पादचाऱ्यांना या रस्त्यावरुन आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर विजेचे दिवेही नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वेळा अपघात होत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक या ठिकाणी पथदिवे बसवण्याची आणि गतिरोधकाची संख्या वाढविण्याची मागणी करीत आहेत.  

सध्या मुंबई -बंगळूर महामार्गा लगत बाणेर जवळ असणाऱ्या पाषाण-सूस खिंडीत पुलाचे काम सुरु असून,  याठिकाणी हा पूल वाहतुकीस बंद करून ही वाहतूक जवळच्या  अंतर्गत रस्त्याने वळविण्यात आली आहे.  पाषाण सूस खिंडीवरील पुलाचा वापर हा नागरिक मुळशी, पौड, पिरंगुट, हिंजवडी या ठिकाणी येजा करण्यासाठी करतात.  या भागांमध्ये अनेक लहान-मोठे उद्योग असल्यामुळे येथे बरीच रहदारी असते. हा रस्ता पौड रस्ता आणि चांदणी चौकाला  पर्याय म्हणून वापरला जातो. ही सर्व वाहतूक  पुलाच्या कामामुळे  जवळच्या अंतर्गत रस्त्याने वळवल्यामुळे या रस्त्यावरील ताण खूपच वाढला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास वीस सोसायट्या असून  यातील काही सोसायट्यांची प्रवेशद्वार या रस्त्याच्या जवळच आहेत. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर  गेल्या अनेक वर्षा पासून विजेचे दिवेही नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडता येत  नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना आपला जीव मुठीत घेऊनच याठिकाणी ये-जा करावी लागते.

या ठिकाणी दोन  गतिरोधक आहेत, पण तरी  वाहनांचा वेग हा कमी होत नाही. त्यामुळे वाहनांची वेगमर्यादा कमी होण्यासाठी या भागात गतिरोधकांची  संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर रस्त्याच्याकडेला विजेचे दिवे बसवण्याची ही मागणी नागरिक करत आहेत. या रस्त्यावर गेल्या महिन्याभरात तीन वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. तरी या ठिकाणी प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

याठिकाणी गतिरोधका संदर्भात प्रस्ताव आला असून तो हिंजवडी ट्रॅफिक डिपार्टमेंटकडे देण्यात आलेला आहे. त्याची मान्यता प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिके अंतर्गत  मान्यतेची कारवाई घेऊन नंतरच गतिरोधकाचे काम करण्यात येईल. मध्यंतरीच्या काळात जागेची परिस्थिती पाहून या ठिकाणी थर्मो प्लास्टिक पेंटचे  रंबलर  लावून घेण्यात येणार आहेत. त्याने काही प्रमाणात का होईना गाडीचा वेग कमी होईल.

- दिनकर गोजरे, कार्यकारी अभियंता, पथ  विभाग, पुणे महानगरपालिका.


याठिकाणी पथ दिव्यानंसाठी खांब  बसविण्यात आले असून,  चार ते पाच दिवसात येथे केबल टाकून दिवे बसवून घेण्यात येतील.

-अशोक केदारी, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग,  औंध -बाणेर क्षेत्रीय कार्यालय

 
या पुलाचे काम सुरू झाल्यापासून आमच्या सोसायटी समोरील वाहतूक खूप वाढली आहे. रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. शिवाय रस्त्याच्या कडेला ही विजेचे दिवे नाही त्यामुळे अंधार पडल्यावर  घराच्या बाहेर पडायला सुरक्षित वाटत नाही.

-अनुराधा कदम, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT