paperBag 
पुणे

प्लॅस्टीक बंदीमुळे भाजीमंडईत रद्दी पेपरला मागणी

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणेे) : महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लॅस्टीक बंदी कायदा लागु केल्याने याची सांगवी परिसरात बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. सांगवी व परिसरात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडुन जनजागृती करण्यात येत आहे. येथील भाजी मंडई व बाजारपेठेत याचा परिणाम पहावयास मिळत आहे.

भाजी व्यावसायीकांनी याबाबत प्लॅस्टीक बंदीमुळे कॅरीबॅग बंद असल्याचे फलक हातगाड्यांवर लावले आहेत. मात्र अजुनही अनेकजण कॅरीबॅग हा सवयीचा भाग झाल्याने कापडी पिशवी सोबत न घेताच भाजी खरेदीसाठी थेट येतात. अशा ग्राहकांसाठी जुनी सांगवीत भाजी विक्रेत्यांनी पेपर रद्दी ठेवण्यास सुरूवात केली आहे. तर बाजारपेठेतील मिठाईची दुकाने, फळविक्रेत्यांनी काही महिला बचत गटांकडुन स्वताच्या नावाच्या कागदी पिशव्या तयार करण्यास ऑर्डर दिल्याचे समजते. अनेक नागरीक नेहमीच्या सवयीप्रमाणे भाजी खरेदीसाठी बाजारात येतात मात्र बाजारात पोचल्यावर प्लॅस्टीक बंदी असल्याचे लक्षात येते. परत घरी जाऊन पिशवी आणण्यापेक्षा असे नागरिक भाजी विक्रेत्यांना तुच काहीतरी व्यवस्था कर असे सांगतात त्यामुळे येथील बहुतांश भाजी विक्रेत्यांनी रद्दी पेपर ठेवले आहेत. "अशा पिशवी विसरून आलेल्या ग्राहकांना आम्ही पर्यायी पेपर रद्दीतुन भाजी देतो. कापडी पिशवी परवडत नसल्याने पेपर रद्दीचा मार्ग सोपा वाटतो.",असे भाजी विक्रेते पांडुरंग पवार यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. 

"बाजारपेठेतील गरज लक्षात घेवुन गरजु महिलांकडुन कागदी पिशव्या तयार करण्याचे काम सुरू करायचे आहे. यामुळे महिला बचत गटांना काम मिळेल, असे सावित्रीबाई फुले महिला बचत गटच्या अध्यक्षा सुजाता निकाळजे यांनी सांगितले. 

मिठाई  पॅकींगसाठी जाड कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. कॅरीबॅग मागु नये असे सुचना फलक दुकानात लावण्यात आले आहेत, असे मिठाई विक्रेत्याने सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संयम राखला! जंतर-मंतरवर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर; म्हणाले, आंदोलनाला परवानगीच दिली नव्हती

Video : अजिंक्य रहाणेचा अभिनय पाहिलात का? दीर्घ श्वास अन् रवी शास्त्रींची हुबेहूब नक्कल; कैफ, जडेजा यांना हसू आवरेना

Marathi News Updates : 'देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्राच्या राजकारणात प्रवेश करतील'

Numerology: क्षणात राग, क्षणात प्रेम! 'या' मूलांकांच्या मुलींचे 'मूड स्विंग्स' सांभाळणे असते कठीण! जन्मतारखेवरून ओळखा स्वभाव!

Dr. Narendra Dabhokar Case : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : हायकोर्टाकडून सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

SCROLL FOR NEXT