dsk.jpg 
पुणे

डीएसकेंच्या कुत्रे अन् मांजरांबाबत न्यायालयात काय झाले वाचा...

सकाळवृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या बंगल्यात असलेले दोन कुत्रे आणि सहा मांजरे देखभालीसाठी 'रेस्क्यू' या संस्थेकडे सुपूर्त करण्यात यावीत, अशी मागणी करणारा अर्ज बचाव पक्षाकडून न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने डीएसके यांचा बंगला जप्त केला आहे. त्यामुळे संबंधित कुत्रे व मांजरी बंगल्यात अडकून पडले आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांना 'रेस्क्यू' या संस्थेकडे सुपूर्त करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत दाखल केला आहे. 

गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेसह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या डीएसके हे कुटुंबातील सदस्यांसह येरवडा कारागृहात आहेत. ठेवीदारांची गुंतवणूक परत करण्यासाठी ईडीने डीएसके यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात त्यांच्या बंगल्याचा देखील समावेश आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, त्यामुळे डीएसके यांच्या घरातील दोन कुत्रे, सहा मांजरे ही देखभाली विना आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षक लॉकडाऊनमुळे कामावर येऊ शकत नाही. त्यामुळे या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज दाखल करून ते प्राणी 'रेस्क्यू' या संस्थेकडे सुपूर्त करण्याची मागणी केली. 'रेस्क्यू' संस्थेने या प्राण्यांना सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे. ही संस्था प्राण्यांचा सांभाळ करते. न्यायालयाने बचाव पक्षाची बाजू समजून घेतली असून याबाबत उद्या (ता. 5) निकाल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT