Fastag 
पुणे

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅगच्या वसुलीला स्थगिती देण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग यंत्रणेत त्रुटी असून, त्यामुळे वाहनचालकांची लूट होत असल्यामुळे तेथे वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने एका निवेदनाद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘फास्टॅग सक्ती करण्यात आल्यावर द्रुतगती मार्गावरील यंत्रणेत त्रुटी निर्माण झाल्या आहेत. तेथे निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांची लूट होत आहे.

तसेच राज्यातील अनेक टोल नाक्‍यांवर २४ तासांत परतीच्या प्रवासावर टोल रकमेत ५० टक्के सवलत दिली जाते. मात्र, येथेही टोल रकमेत सवलत मिळावी, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, या बाबत द्रुतगती मार्गावरील प्रशासकीय कार्यालयात विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT