demand ransom from hotel owner in chakan police arrested accused pune crime news crime
पुणे

Pune News : चाकणला एका हॉटेल चालकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला अटक

मला तू दररोज दारू व जेवण द्यायचे नाहीतर मी तुझे हॉटेल चालू देणार नाही

हरिदास कड

Chakan News : येथील पुणे -नाशिक महामार्गावरील एका हॉटेल चालकाकडे एक हजार रुपयाचा हप्ता मागितल्या प्रकरणी तसेच रोज दारू व जेवण द्यायचे नाहीतर मी तुझे हॉटेल चालू देणार नाही.

याप्रकरणी हॉटेल चालकाने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रशांत बाबुराव दातार (वय 22 वर्ष, रा. खंडोबामाळ,चाकण ता. खेड, जि. पुणे) याच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी तसेच इतर कलमा नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ड्रीमलँड हॉटेलचे चालक शरद कृष्णाप्पा शेट्टी (वय 42 वर्ष, रा.चाकण ता. खेड, जि. पुणे, मुळ रा.खेराडी ता. कुंदापूर, जि. उडपी,राज्य -कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी प्रशांत दातार या आरोपीने फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये दारू व जेवण पार्सल घेतले.पार्सल चे बिल मागितले असता आरोपीने फिर्यादी शेट्टी यांना शिवीगाळ, दमदाटी केली. मी आत्ताच जेलमधून सुटून आलो आहे.

मला तू दररोज दारू व जेवण द्यायचे नाहीतर मी तुझे हॉटेल चालू देणार नाही. तुझे हॉटेल चालवायचे असेल तर तुला मला एक हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणून फिर्यादीला धमकावले.

आरोपीने हॉटेल बाहेर जाऊन मोठ मोठ्याने आरडाओरडा केला तसेच शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. हप्ता दिला नाही तर तुला कोयत्याने तोडतो असे म्हणून धमकी दिली आहे. असे फिर्यादित म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT