dp.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' सोसायटीतील धोकादायक डीपी हटविण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

 पुणे : अरण्येश्वर येथे संतनगरमधील गुरूदत्त सोसायटीमध्ये महावितरणने विजेचा डीपी बसविलेला आहे. हा डीपी या ठिकाणावरून हलविण्यात यावा अशी मागणी  या सोसायटीमधीलील नागरिकांनी केली आहे. गुरूदत्त सोसायटीमध्ये गेटच्या जवळ विजेचा डीपी बसविण्यात आलेला आहे. याठिकाणी सहा महिन्यांपासून हा डीपी आहे. हा डीपी आधी बाहेर बसविण्यात आला होता तो आता सोसायटीमध्ये बसविला आहे. येथे लहान मुले खेळत असतात. लहान मुलांना विजेचा धक्का लागू शकतो. अपघात होण्याची शक्यता आहे. सोसायटीमध्ये अशा प्रकारे डीपी बसविणे धोक्याचे ठरू शकते. महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे. डीपी बसवायला सोसायटीच्या चेअरमनची परवानगी असली तरी सोसायटीमधील नागरिकांनी याला विरोध केला आहे. गुरूदत्त सोसायटी आणि त्याच्याशेजारील नामदास स़ोसायटी यामधील रहिवाशांचा याला विरोध आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


येथील रहिवाशांनी एक महिन्यांपूर्वी महावितरणला अर्ज देऊन हा डिपी हलविण्याची मागणी केली होती. तरीसुध्दा यावरती कोणती कारवाई महावितरणकडून करण्यात आलेली नाही. रहिवाशांनी सतत पाठपुरावा करून डीपी हलविण्याची मागणी केलेली आहे. महावितरणकडून दोन दिवसांत हलवू नंतर काम करू अशी उत्तरे देण्यात आलेली आहेत. हा डीपी बसविणारा ठेकेदारही नागरिकांना दाद देत नाही. याठिकाणी महावितरणचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नागरिकांच्या परवानगी नसताना याठिकाणी डीपी बसविण्यात आलेला आहे. आता मात्र महावितरण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याठिकाणी अपघात झाल्यास महावितरण जबाबदार रहाणार का असा प्रश्न सोसायटीमधील रहिवाशी विचारत आहेत. हा डिपी लवकरात लवकर सोसायटीमधून हलविण्यात यावा, अशी मागणी रहिवाशी रूपेश तूरे आणि अमित सोहेल यांनी केलेली आहे. याबबत महावितरणच्या अधिकारी अंजली मोने यांच्यांशी संपर्क होऊ शकला नाही‌.

 

हा डीपी आमच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेला आहे. आता डीपी हलविण्यास महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. हा डिपी लवकरात लवकर आमच्या सोसायटीमधून हलवण्यात यावा.
- रूपेश तुरे, नागरिक, गुरूदत्त सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT