sanghvi.
sanghvi. 
पुणे

पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावरील खड्डे दुरूस्तीची मागणी

रमेश मोरे

जुनी सांगवी - जुनी सांगवी दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले आहेत. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो.गेली काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले आहेत.पावसात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाक्या घसरण्याचे प्रकार घडत आहेत.तर खड्ड्यांमुळे रहदारीस अडथळा होत आहे. सकाळी व रात्री दापोडी सांगवी परिसरातील स्कुलबस,पिंपरी भोसरीकडे कामाला जाणा-या मंडळींची रहदारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असते.तर सांगवीतुन दापोडी येथे शाळेसाठी पायी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुलाच्या डाव्या वळणावर वसंतदादा पुतळा महानगर बसस्थानक आहे.पुणे शहर व विविध भागात येथुन पन्नासच्यावर बसगाड्यांच्या फे-या होतात.खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरून अनेकदा येथे किरकोळ अपघातही घडले आहेत.पुलाच्या दोन्ही बाजुनी उतार रस्ता आहे.वहाने वेगात असतात यातच डांबराचा थर निघाल्याने रस्ता खड्डेमय होवुन निसरडा झाला आहे.जेष्ठ नागरीक,विद्यार्थी,पादचारी यांना येथुन रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच वेगात येणारी वाहने यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका संभवतो.येथील पुलरस्त्याची दुरूस्ती करून पुलाच्या दोन्ही बाजुला गतिरोधक उभारण्यात यावा अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.

रस्ता खडबडीत झाल्यामुळे दुचाकी, तिनचाकी रिक्षासारखी वहाने घसरतात. - अरविंद गायकवाड- वहान चालक

संबंधित स्थापत्य
विभागाला येथील दुरूस्तीच्या सुचना दिल्या आहेत. लवकरच येथील दुरूस्ती करण्यात येईल.-संतोष कांबळे - नगरसेवक

येथील परिस्थितीबाबत वरिष्ठांना कळविले आहे.येथील दुरूस्तीबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुरूस्तीचे काम करण्यात येईल. 
-सचिन सानप कनिष्ठ अभियंता स्थापत्य-प्रभाग क्रं-३२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही राखीव दिवस; पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा लागणार निकाल?

Latest Marathi News Live Update: बारामतीत बारावीचा निकाल 96.32 टक्के.....

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडद रंगाच्या लोकांना आफ्रिकन म्हंटले नाही; क्लिप केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा दावा

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

SCROLL FOR NEXT