Fastag 
पुणे

फास्टॅगमधून सवलतीसाठी खेड शिवापूरला स्वतंत्र मार्गिकेची मागणी

सकाळवृत्तसेवा

खेड शिवापूर - फास्टॅगद्वारे टोलवसुलीची शंभर टक्के अंमलबजावणी करताना खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल फ्री असलेल्या वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका असावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. तर, स्थानिकांना फास्टॅग बसवून मासिक पासचे रिचार्ज करावे लागेल, असे ‘एनएचएआय’ आणि खेड शिवापूर टोल प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांच्या टोलमाफीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एनएचएआय’च्या टोल नाक्यांवर येत्या एक जानेवारीपासून फास्टॅग टोलवसुलीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, सध्या पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर हवेली (पुणे शहर व पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हे, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोल फ्री सोडण्यात येत आहे. त्यामुळे फास्टॅग बंधनकारक झाल्यास खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल फ्री वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था काय असणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सध्या स्थानिक नागरिकांना टोल फ्री सोडण्यात येत आहे. त्यामुळे एक जानेवारीपासून खेड शिवापूर टोल नाक्याच्या सर्व मार्गिका फास्टॅग होणार असल्या, तरी स्थानिक नागरिकांच्या टोल फ्री वाहनांसाठी एक मार्गिका ठेवण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

फास्टॅग पद्धतीत स्थानिकांच्या टोलमाफीबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. मात्र, फास्टॅग सिस्टिमच्या अंमलबजावणीत सध्याचा टोलमाफीचा निर्णय कायम ठेवता येईल की नाही, याबाबत शंका आहे.
 - सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, ‘एनएचएआय’ 

‘एनएचएआय’ने दिलेल्या फास्टॅग मार्गदर्शक सूचनांमध्ये स्थानिकांना टोलमाफी नसून, मासिक पासची सुविधा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना फास्टॅग बसवून त्यात मासिक पासचे रिचार्ज करावे लागेल.
 - अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड

फास्टॅग हा विषय नंतरचा असून, खेड शिवापूर टोल नाका हटवा, ही आमची मुख्य मागणी आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी टोल देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमची टोल नाका हटावची मागणी घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत.
-  माउली दारवटकर, निमंत्रक, खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT