water tanker 
पुणे

पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षी जास्त पाऊस पडल्याने टॅंकरच्या मागणीत मोठी घट 

सकाळवृत्तसेवा

पुणे - यंदा एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्यापही पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकही टॅंकर सुरू झाला नाही. गेल्यावर्षी जास्त पाऊस पडल्याने टॅंकरच्या मागणीत मोठी घट झाली आहे. 

गेल्यावर्षी 7 एप्रिलपर्यंत 102 टॅंकर सुरु झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील गतवर्षीची टॅंकरची शंभरी यंदा शून्यावर आली आहे. गेल्या वर्षी अगदी भर हिवाळ्यात म्हणजे जानेवारीपासूनच टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील 61 गावे आणि 638 वाड्या-वस्त्या तहानलेल्या होत्या. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी 102 टॅंकर सुरू करावे लागले होते, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी गुरुवारी (ता. ९ ) सांगितले. 

दरम्यान, जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्याचा मागील वर्षीच्या एक आॅक्टोंबरपासून येत्या 30 जूनपर्यंतचा 30 कोटी रुपयांचा पाणी टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याला मंजुरीही  दिलेली आहे. यामध्ये विंधन विहीर दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, विहीरींमधील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि टॅंकर किंवा बैलगाडीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT