water-tanker 
पुणे

लॉकडाउनमुळे वाढली पिंपरी शहरात टॅंकरची मागणी  

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढविला असतानाच वाढलेली पाण्याची तहान भागविण्यासाठी शहरातील सोसायट्यांकडून करण्यात येणाऱ्या टॅंकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमुळे सदस्यांची संख्या अधिक काळ घरातच राहावे लागत असल्याने पाण्याच्या वापरात वाढ झाली आहे. परिणामी पाण्याची मागणीही त्या प्रमाणात वाढत आहे. 

महापालिकेकडून शहरातील सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी आताच्या परिस्थितीत ते पाणी पुरत नाही. त्यामुळे सोसायट्यांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. पुनावळे, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर या भागातील सोसायट्यांकडून टॅंकरला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे सदस्य सुदेश राजे यांनी सांगितले. 

सोसायट्यांच्या खर्चात वाढ 
पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सोसायट्यांकडून मागविण्यात येणाऱ्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाल्याने तेथील देखभाल खर्चाच्या रकमेतही वाढ झाली आहे. अचानकपणे वाढलेल्या या मागणीमुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकच्या रकमेची तरतूद करावी लागत आहे. पूर्वी मोठ्या सोसायट्यांना दिवसाला दोन लाख लिटर पाणी लागत होते. आता त्यात पन्नास ते साठ हजार लिटरची भर पडली आहे. उन्हाळा आणि लॉकडाउनचा कालावधी यावर पाण्याच्या मागणीत भविष्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT