sushmita dev sakal
पुणे

Sushmita Dev : लोकशाहीचा खून होतोय; तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुष्मिता देव

‘राजकारण ही एक प्रकारे देशसेवा आहे. परंतु सध्या भारतीय संविधानाला कमजोर केले जात असल्याची चर्चा आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - ‘राजकारण ही एक प्रकारे देशसेवा आहे. परंतु सध्या भारतीय संविधानाला कमजोर केले जात असल्याची चर्चा आहे. लोकशाहीत सरकार न्यायव्यवस्थेला आणि प्रशासकीय व्यवस्थेला काय करायचे, काय करायचे नाही हे सांगते. त्यावेळी लोकशाहीचा खून होतो,’ अशा कठोर शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार सुष्मिता देव भावना व्यक्त करत केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका केली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या मास्टर्स इन पोलिटिकल लिडरशिप ॲण्ड गर्व्हन्मेंट अभ्यासक्रमाच्या १९ व्या बॅचची सुरवात सोमवारी करण्यात आली. यावेळी देव बोलत होत्या. कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

देव म्हणाल्या, ‘तरूणांनी देशसेवा करण्यासाठी राजकारणात आले पाहिजे. राजकारणाविषयी कोणी काहीही सांगितले, तरीही शेवटी तुमची विचारधारा सर्वात महत्त्वाची असते. राजकारणात येण्यासाठी तरूणांनी ‘हौसला बुलंद’ ठेवायला हवा.’ वडेट्टीवार म्हणाले, ‘‘देशात राजकारण महागले आहे. राजकारणात सोपे नाही. आज आपण एका वेगळ्याच वळणावर आहोत. जिथे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सांगितले जात आहे. परंतु तरूणांनी माणसांना जोडणारे राजनीती करण्यासाठी राजकारणात यायला हवे.’

ॲड. नार्वेकर म्हणाले, ‘एमआयटीमधील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा नागपूर आणि मुंबईमध्ये विस्तार करून त्या माध्यमातून राजकीय नेतृत्व घडविण्यासंदर्भात अभ्यासक्रम राबविण्यात येईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसोबत विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल.

अशा अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना विधानसभा सदस्यांसमवेत प्रत्यक्ष इंटरर्नशिपसारखे सोयी उपलब्ध करून देणे, तसेच विधानसभा सदस्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे.’ एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले.

यशस्वी नेता होण्यासाठी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिलेला कानमंत्र -

- छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा

- ध्येयापासून दूर जाऊ नका

- संयम बाळगायला हवा

- स्वत:चा विचार करण्यापेक्षा जनतेचा, समाजाचा विचार करावा

- अनुभव तुम्हाला नेतृत्व शिकवेल

- विचारधारा महत्त्वाची

- लोकांची सेवा करायला सुरवात करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT