लोकशाही दिनाचे आयोजन
नाशिक : विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार,१० ऑगस्ट रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात.यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल,त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज १० ऑगस्ट रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी ११ वाजता सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभाग,नाशिकचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले आहे.
--------
साहित्य आणि खतांच्या गोणी लंपास
अंबासन, ता. बागलाण : छत्रपती संभाजीनगर-अहवा राज्य मार्गावरील अंबासन फाट्यानजीक असलेल्या बंद ''श्री श्री कृषी क्लिनिक'' आणि गोडाऊनमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना शुक्रवारी (ता.७) पहाटे उघडकीस आली.चोरट्यांनी दुकान व गोडाऊनच्या मागील बाजूचे लोखंडी पत्रे उचकटून आत प्रवेश करत हजारो रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य आणि खतांच्या गोणी लंपास केल्या. तसेच,लगतच्या एका रसवंती टपरीचा कडी-कोयंडाही तोडल्याचे समोर आले आहे. अंबासन फाट्याजवळ रोहन खेमराज कोर यांचे ''श्री श्री कृषी क्लिनिक'' नावाचे शेतीपयोगी साहित्याचे दुकान होते. दुकान दीर्घकाळापासून बंद असल्याची माहिती असलेल्या चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला.
------------
वडगाव शिवारात शेतीशाळा
मालेगाव: वडगाव(ता.मालेगाव) शिवारात शेतीशाळा पार पडली. कृषि विज्ञान केंद्र वडेल येथील विषय विशेषज्ञ पवन चौधरी व विजय शिंदे यांनी नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञान,जीवामृत,बीजामृत, घनजीवामृत,दशपर्णी अर्क,जैविक कीड व रोग व्यवस्थापन तसेच सेंद्रिय निविष्ठांचा प्रभावी वापर याविषयी शास्त्रीय माहिती दिली. त्यांनी नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत,जमिनीची सुपीकता वाढ आणि पर्यावरण संवर्धन कसे साध्य होते याचे उदाहरणांसह विवेचन केले.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शीतल सवळे यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी नैसर्गिक शेतीतील पिकनिहाय एसओपीनुसार सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.