nurse.jpg 
पुणे

'त्या' नर्सेसला कोविड सेवेतून सूट देण्याची केली जाते मागणी कारण...

बाबा तारे

औंध (पुणे) : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीने येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारीकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सकाळी निदर्शने केली.

यामध्ये प्रामुख्याने परिचारिकांची सहा हजार रिक्त पदे भरण्यात यावीत, कंत्राटी व बंधपत्रित परिचारीकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, कोविड सेवा संपल्यानंतर सात दिवस क्वारंटाइन ठेवले जावे, सेवा बजावताना दर्जेदार किट, मास्क ग्लोज पुरवले जावेत, ज्या परिचारिका  ह्रदयविकार, मधुमेह व इतर दुर्धर आजारांनी त्रस्त आहेत अशा परिचारिकांना  कोविड सेवेतून सूट देण्यात यावी, परिचारिकांना चार तास नियोजित कामाची वेळ असावी, पन्नास लाखाचा विमा परिचारिकांना तत्काळ लागू करण्यात यावा व परिचारिकांना सेवा देताना मृत्यू आल्यास अनुकंपा तत्वावर वारसास सेवेत दाखल करून घ्यावे, बाधित परिचारिकांना रुग्णालयात वीस टक्के राखीव खाटा असाव्यात, मुंबई महापालिकेप्रमाणे परिचारिकांना दर दिवशी तीनशे रुपये भत्ता देण्यात यावा  या मागण्यांचा समावेश होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सर्व मागण्या राज्य सरकारने तातडीने पूर्ण करण्यासंबंधी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व परिचारिकांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी रुग्णसेवा खंडित न करता काही परिचारिकांना सेवेत ठेवून निदर्शने करून परिचारिकांनी रुग्णांचीही काळजी घेतली. पुणे नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर, अतिरिक्त सचिव रेखा थिटे, औंध पुणे जिल्हा रुग्णालयाच्या सहसचिव प्रेरणा भद्रे, अरुणा जाधव यांच्यासह वैशाली कर्डिले, प्रियांका जाधव, इंदू सरवदे, सुनीता कुंभार, दीपा माने, निवेदिता जव्हेरी, मंगल पांढरे या परिचारिका यावेळी  उपस्थित होत्या. 

औंध :- जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी  निदर्शने करताना परिचारिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT