पुणे

डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिंतेत

CD

बालेवाडी, ता. १८ : डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाणेर-बालेवाडी परिसरात डेंगी, हिवतापाच्या संसर्गाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून तिथे पाणी साचत असून, डासांची पैदास वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने या भागात प्रत्येक सोसायटीत डेंगी आणि हिवतापाचे रुग्ण आढळले असून साथीच्या आजारांत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग क्रमांक ३ चे काम बाणेर-बालेवाडी परिसरात वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी खोदकाम, बांधकाम साहित्य आणि खड्ड्यांमध्ये साचणारे पावसाचे पाणी डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. दुसरीकडे, बाणेरमधून वाहणाऱ्या रामनदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि वाढलेल्या जलपर्णीमुळेही परिसरात डासांचा त्रास वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
बाणेर-बालेवाडीतील अनेक गृहनिर्माण संस्थांना आजही अपुऱ्या महापालिका पाणीपुरवठ्यामुळे खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. पाणी साठवताना सर्व टाक्या आणि ड्रम कायम झाकून ठेवणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य आरोग्य विभागाने डेंग्यू आणि हिवताप नियंत्रणासाठी अतिसंवेदनशील भागांमध्ये ताप रुग्णांचे सर्वेक्षण, कीटकनाशक फवारणी, कायमस्वरूपी पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे आणि आवश्यक ठिकाणी फॉगिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बाणेर-बालेवाडीतील गृहनिर्माण संस्थांमध्ये डास नियंत्रण मोहीम, फॉगिंग आणि अळीनाशक फवारणी राबवावी.
ॲड. परशुराम तारे, बाणेर- बालेवाडी नागरिक मंच

नागरिकांनी घर किंवा परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या व ड्रम झाकून ठेवणे. कुंड्या, टायर आणि रिकाम्या भांड्यांतील पाणी नियमित बदलणे तसेच तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करावी.
- गोविंद दांगट, सहायक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकऱ्यांच्या जीवन संपविण्याचे सत्र सुरूच; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन

'आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई' गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-

SCROLL FOR NEXT