Dengue esakal
पुणे

Dengue : पुणे शहरात महिलांच्या तुलनेत पुरुषांना डेंगीचा डंख जास्त

पावसाला सुरुवात होताच डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात आतापर्यंत डेंगीचे निश्चित निदान झालेल्या ५१ रुग्णांपैकी ३४ जण पुरुष असून, १७ महिला आहेत. पुरुषांमध्येही १५ ते २५ वर्षे वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेने डेंगीच्या ५१ रुग्णांचे लिंग आणि वय या आधारावर विश्लेषण केले आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

पावसाला सुरुवात होताच डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांच्या संख्येतही फार मोठी वाढ झाली नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. ताप, सर्दी, खोकल्याच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक दहापैकी दोन ते तीन रुग्ण डेंगी संशयित असतात. त्यांना डेंगीची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सागर वैद्य यांनी दिली.

मुले-मुलींना सर्वाधिक ताप

डेंगीचे निश्चित निदान झालेल्या रुग्णांमध्ये १५ ते २५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटात मुलांमध्ये गेल्या आठ महिन्यांत १२ रुग्णांना डेंगीचे निश्चित निदान झाले असून, त्यात ९ रुग्ण गेल्या दोन महिन्यांतील आहेत. महिलांमध्येही याच वयोगटातील सर्वाधिक म्हणजे सहा रुग्ण असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे.

शहरात २२ दिवसांत २२८ संशयित रुग्ण

शहरात या वर्षी आतापर्यंत डेंगीचे ९२५ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २२८ रुग्ण एकट्या ऑगस्टमध्ये आढळले आहेत. त्यापैकी निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या १२ असल्याचेही विभागाने स्पष्ट केले.

डासोत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्यांना आता नोटीस बजावण्यात येत आहेत. वर्षभरात आतापर्यंत एक हजार ४७७ नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार ४०० रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.

- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

पावसाळ्यातच का वाढतो डेंगी?

घर, सोसायटी आणि कार्यालयांच्या परिसरात पावसाचे पाणी साचते. तसेच, घरातील फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, गच्चीवरील कुंड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात आणि नारळ करवंट्या, फुटलेल्या काचा, बाटल्यांची टोपणे, टायर, भंगार साहित्य अशा वेगवेगळ्या ठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होते. या डासांच्या माध्यमातून डेंगीच्या विषाणूंचा प्रसार होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT