Jio-Chat 
पुणे

अरे व्वा! शिक्षण विभागाने ‘जिओ चॅट’वर आपले स्वतंत्र ’चॅनल’ केले खुले

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाईन शिक्षण घेताना बिनचूक आणि वस्तुनिष्ठ असे अस्सल ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘जिओ चॅट’वर आपले स्वतंत्र ’चॅनल’ खुले केले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ऑनलाईन शिक्षणाची वेगळी वाट निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण अधिकारी,संस्था चालक, शिक्षक यांच्यासाठी देखील याद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून ’जिओ चॅट चॅनल’ शिक्षण विभाग आणि शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील दुवा ठरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिषदेने नुकतीच ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, यात सहा हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असल्याची माहिती परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

सहभागी होण्यासाठी हे करा

  • ‘जिओ चॅट’ हे ॲप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा. 
  • आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून नोंदणी करा
  • चॅनलमध्ये एससीईआरटी महाराष्ट्र वाहिनी शोधा आणि जॉइन करा

‘जिओ चॅट चॅनलचे फायदे 

  • पालक, शिक्षक, शाळा, अधिकारी यांना एकाचवेळी मेसेज.
  • शैक्षणिक साहित्य मिळेल, शालेय शिक्षण विभागाकडून येणारे आदेश मोबाईलवर मिळणार.
  • विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अभ्यासमाला, अवांतर पुस्तके.
  • वस्तुनिष्ठ माहिती मिळण्याचा स्त्रोत.
  • संबंधित विषय शिक्षकांना साहित्य, माहिती, संशोधने, प्रशिक्षणे, विविध सर्व्हे याची माहिती.
  • जिल्ह्यातील शिक्षकांना, शाळांना संदेश देण्याची सुविधा.
  • अभ्यासमाला, ई-साहित्य, अवांतर वाचन असे अजून बरेच काही.

राज्यातील सर्व शिक्षणप्रेमी, पालक, शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या जिओ चॅट चॅनलला जॉईन व्हावे
- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

Petrol Diesel Shortage : पेट्रोल, डिझेलची अघोषित टंचाई? पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

Amravati News : अमरावतीतील एमडी तस्करीचं मुंबई कनेक्शन उघड; दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल, चौघांना अटक...

SCROLL FOR NEXT