pune sakal
पुणे

Pune : बाधित क्षेत्रातील नागरिकांनी काळजी घ्यावी

हवामान विभागाचा इशारा; पुणे जिल्ह्यासाठी विशेष सूचनापत्र

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच सामान्यतः ढगाळ हवामान आणि विजांच्या गडगडाटासह पावसाच्या एक-दोन मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात बाधित क्षेत्रातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

बंगालच्या उपसागरात तीव्र झालेल्या चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यभर मॉन्सून सक्रिय झाला आहे. पुण्यातही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वेधशाळेने विशेष सूचनापत्र काढले आहे. मंगळवारी (ता.३) तीव्र पावसामुळे दृष्यमानता घटणे, रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळा निर्माण होणे, नदीकाठी किंवा शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. नेहमी बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याबरोबरच घाट माथ्यावर पर्यटनासाठी जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

एका तासाला १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर ढगफुटी म्हटले जाते. रविवारी पुण्यात तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे ही ढगफुटी नाही. निश्चितच कमी वेळेत जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे निश्चितच सखल भागात पाणी साचले. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाच तासात ७० ते ८० मिलीमीटर पावसाच्या नोंदी झाल्या आहे. दुपारनंतर पाऊस सुरू झाला तर तो रात्री पर्यंत चालू राहील. पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची स्थिती कायम राहील. विशेषतः घाट माथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

- डॉ. के.एस. होसाळीकर, प्रमुख, हवामानशास्त्र विभाग, पुणे

पावसासाठी शब्दावली (तासाभरात पडणारा पाऊस, मिलीमीटरमध्ये) ः

१) हलक्या सरी ः १०

२) मध्यम सरी ः १० ते २०

३) तीव्र सरी ः २० ते ३०

४) जास्त तीव्र सरी ः ३० ते ५०

५) अतितीव्र सरी ः ५० ते १००

६) ढग फुटले ः १०० पेक्षा जास्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT