Pune Loksabha Result sakal
पुणे

Pune Loksabha Result : वसंत मोरे यांच्यासह ३३ जणांची अनामत जप्त

पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे माजी प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे माजी प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते न मिळाल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढविली.

या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते मिळाली नाही तर अनामत रक्कम जप्त होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचा तसा नियम आहे.

या मतदारसंघातील १० लाख ९७ हजार ११२ मते वैध ठरली. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला किमान म्हणजे एक लाख ८४ हजार मते मिळणे अपेक्षित होते. मोहोळ आणि धंगेकर वगळता एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळविता आली नाहीत. मोरे यांना ३२ हजार १२, तर रणपिसे यांना ३ हजार ९७४ मते मिळाली. अन्य उमेदवारांना जेमतेम एक हजारापर्यंत मते मिळाली. त्यामुळे नियमानुसार त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.

यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले,‘‘ आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त होते. या नियमानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT