Neelam Gorhe Sakal
पुणे

Neelam Gorhe : राजकीय धावपळ सुरू पण तरीही महामार्गावरील अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी निलम गोऱ्हे धावल्या

दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका अपघातग्रस्त महिलेला मदत केली आहे. आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान पुणे इथून मुंबईकडे जात असताना पुणे हद्दीतील काळेवाडी जवळील पुलावर दुचाकीवरून चाललेल्या एका महिलेचा अपघात झाला होता.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या मुंबईकडे जात होत्या. अपघात झाल्याचं पाहून त्यांनी गाडीतून खाली उतरून त्या जखमी महिलेची विचारपूस करत सदर महिलेला उपचारासाठी जवळील हॉस्पिटलमध्ये पाठवले. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना धीर दिला.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षेसाठी सोबत असलेल्या पिंपरी - चिंचवड हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना सदरच्या अपघातग्रस्त महिलेला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. "ओरिजनल पक्ष शिंदे यांच्याकडे आहे. त्याचबरोबर भाजपचे ध्येयधोरणे मला आवडलेली आहे. तीन तलाक, कलम ३७० या धोरणांशी मी सहमत असल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे." असं त्या शिवसेनेत प्रवेश घेताना म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parner News: उष्माघातामुळे शिक्षिकेचा मृत्यू; पारनेर तालुक्‍यातील घटना, शाळा सुटल्यानंतर घरी निघाल्या अन् काय घडलं!

Ladki Bahin Yojana: चौदा लाख बहिणींचा लाभ बंद होणार; योजनेसाठी मुदती देऊनही टाळाटाळी, नेमकं काय कारण?

भारतासह अनेक देशांमध्ये इंटरनेट ठप्प होण्याचा धोका, इराण समुद्राखाली डिजिटल हल्ल्याच्या तयारीत

Govt Targets Hospital Bills: खाजगी रुग्णालयांच्या लुटीला ब्रेक? सरकारचा मोठा निर्णय; उपचार खर्च होणार स्वस्त!

जनगणनेतील घरयादीत ३४ प्रश्‍न; काय आहेत प्रश्न, 'या' वेबसाईटवर जाऊन करता येणार जनगणना

SCROLL FOR NEXT