उपमुख्यमंत्री अजित पवार esakal
पुणे

ज्ञानवापीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर निशाणा

प्रत्येकच गोष्टीत राजकारण करायचे टाळा असा सल्ला ही अजित पवार यांनी दिला

सकाळ वृत्तसेवा

बारामती - तीन चारशे वर्षांपूर्वी तेथे काहीतरी झाले होते असे मुद्दे देशात काढले जात आहेत, श्रद्धेचा मुद्दा काढून नवे प्रश्न निर्माण होत आहेत, तुम्हाला काही करायचे असेल ते नव्याने करा, अशा शब्दात ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजपवर टीकास्त्र सोडले. प्रत्येकच गोष्टीत राजकारण करायचे टाळा असा सल्ला ही अजित पवार यांनी यावेळी दिला. बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये रविवारी (ता. 29) उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत वक्तव्य केले.

ते म्हणाले, कायदा सुव्यवस्था अडचणीत आणायची. वातावरण गढूळ करायचे हे अयोग्य आहे, याची नोंद सर्वांनी घ्यावी. हा असे म्हणाला आता तुमचं काय म्हणणं आहे? असे काहीजण विचारतात. अरे तो काय म्हणाला याच्याशी मला काय करायचे आहे? त्याचं म्हणणं त्याला लखलाभ मला माझं लखलाभ. एकाने काही म्हणलं की दुसऱयाने काहीतरी म्हणायचे हे काही बरोबर नाही, असे म्हणत माध्यम प्रतिनिधींना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले.

तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो…

ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते, त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टीका करायची नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाकडी निंबोडी योजनेवरून सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करत सोलापूरकरांनाही खडे बोल सुनावले.

बारामतीसह जिल्ह्यात नवीन उद्योग…

बारामतीसह जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव, तळेगाव एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग यावेत याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. या भागातून मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन भविष्यात जाणार आहे. विमानतळ झाले तर उद्योगपतींना येणे-जाणे सोयीचे होते. ते नवीन उद्योग घेवून येतात. त्यासंबंधीचाही प्रयत्न सुरु आहे. त्यानिमित्ताने नवीन रोजगार निर्माण करून भागाला आर्थिक सुबत्ता यावी, असा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.

जीएसटीबाबत केंद्र आग्रही

बांधकाम व्यावसायिकांनी जीएसटीचा मुद्दा पवार यांच्याकडे मांडला. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, जीएसटी कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. राज्यांना फार तर कौन्सिलपुढे मुद्दे मांडता येतात. लोकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरू पाहणारे मुद्दे आम्ही तेथे मांडत असतो. परंतु जीएसटीबाबत केंद्र सरकार खूप आग्रही आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तुमची अडचण होते, हे मलाही कळते. परंतु जीएसटीकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT