Pune sakal
पुणे

अजित पवारांनीच दाबले रेल्वेचे नाक ! तोंड उघडण्याची प्रतिक्षा..

उपमुख्यमंत्रीच सरसावल्याने आता रेल्वे विभाग यात काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

- मिलिंद संगई

बारामती : शहरातील भिगवण रस्त्याला समांतर रस्ता करण्यासाठी रेल्वे प्रशासन जागा देत नसल्याने अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar) यांनी यात लक्ष घालत रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस (Police) अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे (Mahesh Rokade) यांना दिले. रेल्वेचे (Railway) नाक दाबण्यासाठी आता खुद्द उपमुख्यमंत्रीच सरसावल्याने आता रेल्वे विभाग यात काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वेच्या मालकीची जागा सेवा रस्त्यासाठी मिळावी म्हणून बारामती नगरपालिकेने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी वारंवार चर्चा करुन रेल्वेची जमीन सेवा रस्ता करण्यासाठी देण्याची विनंती केली होती. या बाबत रेल्वेच्या अधिका-यांनी अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतरही फार काही केले नाही.

ही जमीन देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज थेट आपल्या अधिकारांचा वापर करत रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करुन टाकण्याचे आदेश मिलिंद मोहिते यांना दिले.

सदरच्या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत असल्याने आजूबाजूला शाळा व विद्यार्थ्यांचा वावर असल्याने तेथे सेवा रस्त्याची गरज आहे. रस्त्यासाठीच रेल्वेची जमिन मागत असताना रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर अजित पवार यांनीच आज निर्णायक भूमिका घेत मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करुन टाकण्याचे आदेश दिले.

रेल्वेला मालधक्क्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, येथील वाहतूक बंद झाल्यानंतर रेल्वेचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. आता खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यात निर्णायक भूमिका घेतल्याने रेल्वे विभाग नमती भूमिका घेणार की दुसरी काही भूमिका घेणार या बाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या कामाबाबत अजित पवार कमालीचे आग्रही असतात, ही बाब यापूर्वीही बारामतीकरांनी अनेकदा अनुभवली आहे, आता रेल्वेचे थेट नाक दाबण्याचे काम अजित पवार यांनी केलेले असल्याने पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT