ajit pawar 
पुणे

कोरोना लस घेतली का? अजित पवार यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये पिकला हशा

सकाळवृत्तसेवा

पुणे :  पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना निर्मूलन आणि उपाययोजनांबाबतची  बैठक झाली. या बैठकीत शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी अजित पवार यांना आपण लस घेतली का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या मिश्किल उत्तरांने उपस्थित सभेमध्ये हशा पिकला. 

होय रे बाबा, मी लस घेतली पण फोटो  काढला नाही - पवार  

कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना तुम्ही लस घेतली का, असा प्रश्न पत्रकारांनी  अजित पवार यांना विचारला. तेव्हा होय रे बाबा,  मी लस घेतली आहे. पण मला इतरासारखा लस घेतांनाचा फोटो काढायचा नव्हता, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे मी लस घेतल्यावर फोटो काढला नाही. अशी फोटोची नौटंकी मला आवडत नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण केंद्रांची संख्या करणार दुप्पट

पिंपरी चिंचवड  शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. या निर्णयानुसार येत्या 1 एप्रिलपासून जिल्ह्यात 600 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी सांगितले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात 316 केंद्रावर लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांची संख्या दुपटीने वाढवल्यास या केंद्रांसाठी लागणारी अतिरिक्त लस केंद्र सरकारने पुरवणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आजच्या बैठकीतूनच संपर्क साधण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आजपर्यंत सव्वा पाच लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे,  त्या ठिकाणी लस दिली पाहिजे, अशी भूमिका या  बैठकीत मांडण्यात आली. जिल्ह्यात नव्याने आणखी 300 कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.  पण या केंद्रासाठी केंद्र सरकारने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानंतर लसीकरणासंदर्भातील केंद्राचे प्रभारी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बैठकीतूनच संपर्क साधण्यात आला. जावडेकर यांनी पुणे जिल्ह्याला लस पुरवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ,  असे आश्वासन जावडेकर यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या सुरु असलेल्या 316 लसीकरण केंद्रावर गेल्या दोन दिवसात प्रतिदिन 30 हजाराहून अधिक नागरिकांना लस  दिली जात आहे. काल उच्चांकी 38 हजार जणांना लस देण्यात आली आहे. लसीचा साठा अपुरा पडत असून तो वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Latest Marathi News Live Update : एसीबी ट्रॅपचा धक्का, मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएवर पैसे मागितल्याचा आरोप

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

Farmer Debt Relief Scheme : कर्जमाफीसाठी सरकारची तयारी; अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा, ३० जूनपूर्वी घोषणा शक्य

SCROLL FOR NEXT