अजित पवारांनी घेतली नसरापूरकरांची फिरकी, म्हणाले... sakal media
पुणे

अजित पवारांनी घेतली नसरापूरकरांची फिरकी, म्हणाले...

ग्रामस्थ म्हणाले आमची सुध्दा विकास आघाडी आहे.

किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : विविध विकास कामे व राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी वेल्ह्याला निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नसरापूर मध्ये थांबवुन येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला व गावच्या विकासाच्या काही मागण्यांचे निवेदन दिले याला सकारात्मक प्रतिसाद देत दादांनी अचानक ग्रामपंचायतीच्या बाँडीवर अकरा पैकी आपले सदस्य किती आहेत असा प्रश्न केला यावर नसरापूरच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी देखिल मिस्किल उत्तर देत दादा सगळे आपलेच आहेत आमची सुध्दा काँग्रेस राष्ट्रवादीची नसरापूर विकास आघाडी आहे. यावर अजित पवार यांनी स्मितहास्य करत शक्य होईल ती सर्व मदत करु, असे अश्वासन देत वेल्हेकडे रवाना झाले.

अजित पवार नसरापूर मार्गे वेल्हेकडे जाणार असल्याने नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने नसरापूर मध्ये त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले त्या नुसार नियोजन करण्यात आले मात्र अजित पवार वेळे अभावी ग्रामपंचायत कार्यालयात आले नाहीत कार्यालया समोरच गाडी जवळ नसरापूरचे सरपंच रोहीणी शेटे,उपसरपंच गणेश दळवी यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने पवार यांना यावेळी निवेदन देऊन गावा मधील महामार्ग ते भैरवनाथ मंदिर हा मुख्य रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी व दुतर्फा गटर बांधकाम,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी,पीएमआरडीए च्या निधीमधुन गावा मधील अंतर्गतरस्त्यांची कामे व्हावीत,बनेश्वर मंदिर येथे शिवगंगा नदी किनारी बंधारा बांधुन बोटींग व्दारे जलपर्यटन व्हावे अशा मागण्या करण्यात आल्या या मधील मुख्य रस्त,कचरा व्यवस्थापन व जलपर्यटन या बाबत निश्चित काम करु अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

सदस्या उषा कदम,संदिप कदम व ग्रामस्थांनी यावेळी पिएमआरडीए च्या रस्त्याच्या आरक्षणा बाबत मुद्दा यावेळी उपस्थित केल्यावर जे काही आहे ते लेखी द्या पीएमआरडीए च्या अधिकारयां समवते बैठक लावुन यावर मार्ग काढु असे अजित पवार यांनी सांगितले तर जेष्ठ नागरीक निवृत्त पोलिस अधिकारी यशवंत कदम यांनी नसरापूर बाह्यमार्गासाठी सर्व्हे झाला आहे रणजित शिवतरे व विक्रम खुटवड या बाबत पाठपुरावा करत आहेत परंतु कार्यवाही होत नसल्याचे सांगितल्यावर दादांनी हो साहेब करतो असे म्हणुन नसरापूरकरांचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT