पुणे

जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार रिक्षा चालवतात

मिलिंद संगई, बारामती

बारामतीकरांसह राज्यातील जनतेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हटके अंदाजाची सध्या चर्चा रंगली आहे. शनिवारी अजित पवार यांनी बारामतीमध्ये स्वत: रिक्षा चालवत अनेकांना धक्काच दिला. पियोजिओ कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रीक रिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चालवून पाहिली. त्यांनी कंपनीच्या आवारात फेरफटका मारत गाडीची तपासणी केली. पियोजिओ कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून बारामती नगरपालिकेस तीन इलेक्ट्रीक, एक सीएनजी व एक पेट्रोलवरील अशा पाच रिक्षा दिल्या आहेत.

बदलत्या काळानुसार आता पियाजिओ व्हेईकल्स कंपनीने इलेक्ट्रीक वाहननिर्मिती संशोधन व उत्पादनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे व्यक्त केली. पियोजिओ कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून बारामती नगरपालिकेस तीन इलेक्ट्रीक, एक सीएनजी व एक पेट्रोलवरील अशा पाच रिक्षा अजित पवार यांच्या उपस्थितीत मोफत प्रदान करण्यात आल्या. त्या प्रसंगी पवार यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अजित पवार यांनी स्वत: रिक्षा चालवली. पियोजिओ कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रीक रिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चालवून पाहिली. त्यांच्या सोबत पाठीमागे कंपनीचे अध्यक्ष दियागो ग्राफी बसले होते. पवार यांनी कंपनीच्या आवारात एक चककर मारत गाडीची तपासणी केली.

यावेळी बोलतना अजित पवार म्हणाले की, भविष्यात पेट्रोल डिझेलच्या वाहनांच्या वापरावर मर्यादा येणार आहेत, प्रदूषण टाळण्यासह स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचा वापर टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. एसटी देखील या पुढे इलेक्ट्रीकवरच्याच खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे, या पार्श्वभूमीवर पियाजिओ कंपनीनेही आता इलेक्ट्रीक व सीएनजी गॅसच्या वापराच्या वाहनांच्या संशोधन व उत्पादनावर भर द्यायला हवा. राज्य सरकारही या पुढील काळात प्रदूषणमुक्त राज्य करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT