Ajit_Pawar 
पुणे

पुण्यात लॉकडाऊन नाही, पण...; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, कोरोना प्रतिबंधासाठीचे निर्बंध फक्त कागदोपत्री ठेऊन चालणार नाही. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला केली आहे. दरम्यान, पुणे शहरात लॉकडाऊनची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची आढावा बैठक बोलावली आहे. आज सकाळी दहा वाजता ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिकांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, दोन्ही पालिकांचे आयुक्त, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी उपस्थित आहेत. 

या बैठकीत कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करायची की, निर्बंध अधिक कडक करायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT