deputy cm ajit pawar pune covid update lockdown night curfew vaccine 
पुणे

पुण्यात लॉकडाऊन? '2 एप्रिल रोजी कठोर निर्णय घेऊ'; अजित पवारांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यातही पुण्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक होताना दिसत आहे. गांभीर्याची बाब म्हणजे, पुण्यातील रुग्ण वाढीचा वेग आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. आज, या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात येत्या पाच-सहा दिवसांत जर, रुग्णांच्या वाढीचा वेग असाच राहिला तर, जिल्ह्याच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात लॉकडाऊन करण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याची आमची इच्छा नाही. परंतु, ही लाट कुठं तरी थांबवायची असेल तर, कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सगळ्यांनीच व्यक्त केलं आहे. त्यामुळं नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असा सल्ला पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले अजित पवार?
कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून नाईलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जे नियम आहेत ते पाळा असं आवाहन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर बंधनकारक आहे. कोरोनाची पहिली लाट होती तेव्हा जी भीती होती ती आता राहिलेली नाही. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे.

काय करणार?

  • पन्नास टक्के खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेणार
  • लसीकरण केंद्राची संख्या 600 पर्यंत वाढवणार
  • लसीकरण केंद्राबाबत केंद्र सरकारशी चर्चा
  • लशींचे डोस कमी पडण्याची शक्यता, केंद्राकडे मागणी करण्याच्या सूचना
  • बेडची संख्या जास्ती जास्त वाढवण्याचं काम
  • जम्बो रुग्णालये पुर्ण वापरात आणण्याचा निर्णय
  • पिंपरी चिंचवड, बाणेरची जम्बो रुग्णालये पूर्ण क्षमतेनं वापरणार
  • ससूनमध्ये बेड वाढवण्याचा निर्णय; आवश्यक यंत्रणा पुरवण्यात आलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT