crime update Inquiry Deputy Commissioner Police in phone tapping case pune  sakal
पुणे

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलिस उपायुक्तांची दुसऱ्या दिवशीही चौकशी

गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून झाली चौकशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या फोन टॅपींग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस उपायुक्ताची कसून चौकशी केली. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत तत्कालीन तांत्रिक विश्‍लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. दरम्यान, शुक्‍ला यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सोमवारीपासुन चौकशी करण्यास सुरुवात झाली होती.

त्यांचा जबाबही सोमवारी नोंद करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी पुन्हा संबंधित पोलिस उपायुक्ताची दिवसभर चौकशी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता जबाब नोंदविण्यात आल्यानंतर अधिकारी बाहेर पडले. फोन टॅपींग प्रकरण त्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन केले, कोणत्या स्वरुपाची माहिती गोळा केली या आणि अशा स्वरुपाची माहिती यावेळी घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणामध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचाही जबाब घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT