Police
Police 
पुणे

निष्काळजीपणाबद्दल उपनिरीक्षकासह दोघांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गंभीर घटना असतानाही जाणूनबुजून गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी ही कारवाई केली. 

पोलिस उपनिरीक्षक सोनाली सिद्धेश्‍वर कथले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक श्‍यामराव पाठक या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांना १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माहिती मिळाली की, यलप्पा बसप्पा तळकेरे या तरुणाला मारहाण झाल्याने तो माई मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. त्यानुसार वरिष्ठांना माहिती देत कथले व फौजदार पाठक हे हॉस्पिटलमध्ये रुग्णास भेटण्यास गेले. त्या ठिकाणी तळकेरे हा अतिदक्षता विभागात उपचार घेत होता आणि बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तसे प्रमाणपत्र रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी दिले होते.

या वेळी पोलिसांनी तळकेरे याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रफिक शेख व प्रकाश कुचबाळ यांच्याकडे चौकशी केली असता, अज्ञात व्यक्तीने तळकेरे यास चाकू मारून जखमी केल्याचे सांगितले. ही बाब या दोघा पोलिसांनी वारजे चौकीत येऊन वरिष्ठांना सांगितली नाही. तसेच सहायक पोलिस निरीक्षक शेवते यांना संबंधित व्यक्ती किरकोळ जखमी असल्याचे सांगून चौकीतून निघून गेले. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी तळकेरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पोलिसांनी त्याच रात्री अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याची दखल घेत कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT