पुणे

खेड-शिवापूर परिसरात बंदी असूनही दारू आणि गुटख्याची जोरात विक्री

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "शासनाच्या आदेशाचे पालन करून आम्ही प्रामाणिकपणे दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र दुसरीकडे दारू आणि गुटख्याची अवैध विक्री जोरात सुरू आहे. त्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे?" असा सवाल खेड-शिवापूर भागातील व्यावसायिक विचारत आहेत. 

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे खेड-शिवापूर परिसरात बंदी असूनही दारू आणि गुटख्याची जोरदार विक्री सुरू आहे. विशेषतः पुणे-सातारा रस्त्यावर वेळू आणि खेड-शिवापूर बाग परिसरातील अनेक हॉटेल आणि बारमधून मोठ्या प्रमाणात चोरून दारू विक्री होत आहे.  तसेच या भागातील अनेक पान टपऱ्यामध्ये  खुलेआम गुटखा विकला जात आहे. या पान टपऱ्यामध्ये विकण्यासाठी गुटखा येतो कोठून? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच दुकाने बंद असल्याचा गैरफायदा घेऊन गुटखा आणि दारूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू आहे.

"शासनाच्या आदेशाचे पालन करून आम्ही नुकसान होत असूनही आमची दुकाने बंद ठेवली आहेत. तर दुसरीकडे या भागात फिरताना गुटखा आणि दारूची अवैध विक्री जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मग नियम फक्त आम्हालाच आणि दारू आणि गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का?" असा सवाल या भागातील व्यावसायिक विचारत आहेत.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, "गुटखा विक्रेत्यांवर आम्ही कारवाई करतोच. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे आम्हाला सगळीकडे कारवाई करणे शक्य होत नाही. अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे अधिकार पोलिसांनाही दिले आहेत. त्यामुळे अशा अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसही कारवाई करू शकतात."

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT