Pune Municipal Corporation Sakal media
पुणे

सैनिकांना निर्णय होऊनही मिळकतकर माफी मिळेना

आजी माजी सैनिक, वीरपत्नींना मिळकतकर माफ करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला पण मुख्यसभेत दिलेल्या उपसूचना देऊन ठराव मंजूर केल्याने अंमलबजावणीचा पेच निर्माण झाला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - आजी माजी सैनिक, वीरपत्नींना मिळकतकर माफ करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला पण मुख्यसभेत दिलेल्या उपसूचना देऊन ठराव मंजूर केल्याने अंमलबजावणीचा पेच निर्माण झाला आहे. यावर गेल्या साडे चार महिन्यात प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. मात्र, यावर ‘सोल्जर इन्डीपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनने पत्रकार परिषद घेऊन देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना ज्या गोष्टी स्वतःहून मिळायला हव्यात त्यासाठी याचना का करायला लावता? असा प्रश्‍न विचारत अशी टीका केली.

राज्य सरकारने आजी माजी सैनिक, वीरपत्नी यांच्या नावाने असलेल्या मिळकतींवरील कर माफ करावा असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार राज्यात सर्वत्र याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने देखील याचा २१ जून रोजी मुख्यसभेत ठराव मंजूर केला. यानंतर शहरातील २० हजार आजीमाजी सैनिकांना मिळकतकर माफीचा लाभ मिळेल अशी अपेक्षा होता. हा ठराव मंजूर झाल्यानंतर अनेकांनी महापालिकेकडे चौकशी सुरू केली, पण अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले.

फाउंडेशनचे योगेश चिधडे म्हणाले, ‘‘पुण्यामध्ये लष्कराच्या महत्त्वाच्या १६ संस्था आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांसह सैनिकांची २० हजार घरे आहेत. पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणी मिळकतकरात माफी देण्यात आली, फक्त पुणे महापालिकेने अद्याप माफी दिलेली नाही. आर्मी वेल्फेअर को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि. 'साळुंके विहार' या सहकारी सोसायटीने महापालिकेशी पत्रव्यवहार केला, सैनिक कल्याण मंडळाने पत्र दिले, पण त्याला महापालिका किंमत दिली नाही. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तर प्रशासकीय मान्यता अद्याप मिळाली नाही असे उत्तर दिले जात आहे. महापालिकेचा हा कारभार संताप आणणारा आहे, अशी टीका चिधडे यांनी केली.

महापालिका निवडणुकीची आचार संहिता लागू होणे पूर्वी ही योजना लागू झाली पाहिजे, व त्यांनी या वर्षाचा मिळकत कर भरला आहे त्यांची रक्कम कपात करून परत करावी अशी मागणी सुमेधा चिधडे यांनी केली.

यामुळे रखडली अंमलबजावणी

प्रशासनाने मुख्यसभेसमोर सर्वसाधारण करात माफी द्यावी असा प्रस्ताव ठेवला होता. पण मुख्यसभेत सर्वसाधारण कराऐवजी संपूर्ण मिळकतकरात माफ करावा असा निर्णय उपसूचना देऊन घेण्यात आला. यामध्ये संपूर्ण करात राज्य सरकारकडे जमा होणारा कर देखील आहे. तो महापालिका माफ करू शकते का यावर प्रशासनाने विधी विभागाचा अभिप्राय मागविला आहे. तसेच राज्य सरकारच्या कराबाबतचा मुद्दा बाजूला ठेऊन केवळ महापालिकेचा कर माफ करता येऊ शकतो का यावरही प्रशासनाचा विचार सुरू आहे. पण अद्याप याचा अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, असे मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT