Ramdas Bhogade Sakal
पुणे

अपंगत्व येऊनही रामदास भोगाडे यांचा देशसेवेचा ध्यास कायम

छत्तीसगडच्या जंगलात माओवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात आपले दोन्ही पाय गमावलेल्या ३३ वर्षीय कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांनी देशसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्तीसगडच्या जंगलात माओवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात आपले दोन्ही पाय गमावलेल्या ३३ वर्षीय कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांनी देशसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.

पुणे - छत्तीसगडच्या जंगलात माओवाद्यांच्या (Maoist) बॉम्बहल्ल्यात (Bomb Attack) आपले दोन्ही पाय (Legs) गमावलेल्या ३३ वर्षीय कोब्रा कमांडो रामदास भोगाडे (Ramdas Bhogade) यांनी देशसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे. देशासाठी पॅरालिम्पिक्समध्ये (Paralympic) भाग घेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगत ते सध्या शारीरिकरित्या स्वतःला तयार करत आहेत. देशसेवा सुरू ठेवून पॅरालिम्पिक्समध्ये सहभाग घेत धावपटू म्हणून त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, त्यांची ही जिद्द अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे.

भोगाडे हे मूळचे जव्हार तालुक्यातील वडोली रातोनापाडा या दुर्गम आदिवासी भागातले आहेत. नोव्हेंबर २०१० मध्ये ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) विशेष फोर्स संरक्षण तुकडीत रुजू झाले, तर २९ नोव्हेंबर २०२७ मध्ये माओवाद्यांशी सामना करताना बॉम्बहल्ल्यात ते जखमी झाले, त्यात त्यांचे दोन्ही पाय गेले. भोगाडे यांच्या तुकडीत २६ जवान होते. या सर्वांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भोगाडे यांच्यावर आली. या हल्ल्यात आलेल्या अपंगत्वावर त्यांनी यशस्वी मात करत देशाच्या संरक्षणासाठी आपले सेवाकार्य सुरूच ठेवले आहे. सध्या ते पुण्यातील ग्रुप सेंटर सीआरपीएफ तळेगाव येथे आहेत.

यासंदर्भात कोब्रा कमांडो भोगाडे म्हणाले, ‘‘बॉम्बहल्ल्यात जेव्हा दोन्ही पाय गमावले, त्यावेळी माझ्याकडे नोकरी सोडून निवृत्तिवेतन घेऊन घरी बसण्याचा पर्याय होता. पण, मी तो स्वीकारला नाही. देशसेवेसाठी मी कधीच मागे हटणार नाही. मला कृत्रिम पाय बसविले असून, त्यांच्या आधावर मी चालत आहे. लहानपणापासूनच मला विविध खेळांची आवड होती. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी थेट सहभाग घेता आला नाही, तरी धावपटू म्हणून देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करायची इच्छा आहे. मात्र, यासाठी मला रनिंग ब्लेड्स’ची आवश्‍यकता आहे. सध्या रनिंग ब्लेड्स नाहीत, त्यामुळे शारीरिकरित्या स्वतःला अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे.

जिद्दीने पूर्ण केली पदवी...

भोगाडे हे पदवीच्या तिसऱ्या वर्षात होते. त्याच वेळी ते ‘सीआरपीएफ’च्या संरक्षण तुकडीत दाखल झाले. त्यामुळे शिक्षण अर्धवटच राहिले. मात्र, अपंगत्व आल्यावरही भोगाडे यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी मुक्त विद्यापीठातून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले असून, राज्यशास्त्र विषयामध्ये ७८.८३ टक्के प्राप्त करत यश मिळविले आहे, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला.

अपंगत्व हे केवळ शरीराचे असते, विचारांचे किंवा इच्छाशक्तीचे नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली इच्छाशक्ती दृढ ठेवली पाहिजे. त्यामुळे कोणतेही काम करणे शक्य होईल. पाय नसले तरी मी देशसेवा करत राहणार, त्यासाठी हवी तशी मेहनत करेल.

- रामदास भोगाडे, कोब्रा कमांडो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT