Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Budget : महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊनही अर्थसंकल्प महापालिकेच्या संकेतस्थळावर नाही

देशातील पहिली "स्मार्ट सिटी' म्हणविणाऱ्या पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन चार दिवस उलटले, मात्र अजूनही अर्थसंकल्प महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

सकाळ वृत्तसेवा

देशातील पहिली "स्मार्ट सिटी' म्हणविणाऱ्या पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन चार दिवस उलटले, मात्र अजूनही अर्थसंकल्प महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

पुणे - देशातील पहिली "स्मार्ट सिटी' म्हणविणाऱ्या पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन चार दिवस उलटले, मात्र अजूनही अर्थसंकल्प महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. अशा प्रकारे नागरीकांपासूनच अर्थसंकल्प दडवून ठेवण्याचे कारण काय ? अशी टिका सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. सुमारे साडे नऊ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना कुमार यांनी वाहतुक कोंडी, रस्ते, पाणी पुरवठा व सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा विचार व्यक्त केला होता. दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्सुकता असलेल्या अभ्यासक, तज्ज्ञ व सर्वसामान्य नागरीकांकडून मागील चार दिवसांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्थसंकल्पाची माहिती घेतली जात आहे. मात्र अजूनही महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्थसंकल्प देण्यात आला नाही.

याविषयी वेलणकर म्हणाले, 'पुणे महापालिका देशातील पहिली स्मार्ट सिटी आहे. मात्र या महापालिकेला आपला अर्थसंकल्प सादर होऊन चार दिवस झाल्यानंतरही तो संकेतस्थळावर अद्ययावत करण्याची गरज वाटत नाही, हे संतापजनक आहे. नागरीकांच्या करांच्या पैशाचे नियोजन बजेटमधून होत असते. मात्र तोच अर्थसंकल्प नागरीकांपासून दडवून ठेवण्याचे कारण काय ? याचे गौडबंगाल अद्याप उलगडत नाही. महापालिकेने त्वरीत अर्थसंकल्प संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT