Devdoot
Devdoot 
पुणे

महापौरांना हव्यात आणखी नऊ ‘देवदूत’

ज्ञानेश सावंत

पुणे - आपत्ती निवारणाच्या तब्बल ५३ कोटी रुपयांच्या ‘देवदूत’ वाहनांची खरेदी वादग्रस्त ठरत असतानाच, या योजनेवर आता आणखी ८१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ‘देवदूत’ची कामगिरी योग्य असल्याची शाबासकी देत, पावणेनऊ कोटी रुपयांचे एक अशी नऊ वाहने खरेदी करण्याबाबतचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्याचे उघड झाले आहे.

त्यानुसार वाहने खरेदीची कार्यवाही महापालिका प्रशासन करीत आहे. ही प्रक्रिया झाल्यास ‘देवदूत’ची योजना पुणेकरांसाठी १३४ कोटी रुपयांत पडणार आहे.  

महापौरांची ही मागणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने फारच मनावर घेतली आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याची हमी ठेकेदाराला दिली असून, वाहने पुरविण्याचा शब्द या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. ‘योजना आखली तेव्हाच वाहने वाढविण्याचा निर्णय झाल्याचे ठेकेदाराचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनातील अधिकारीच ‘देवदूत’वर कृपादृष्टी दाखवत असल्याचे स्पष्ट आहे. या योजनेसाठी महापालिकेने ‘देवदूत’ वाहने खरेदी करून, ती चालविण्यासाठी ठेकेदाराला दिली आहेत. वाहने महापालिकेची असतानाही एका वाहनासाठी ठेकेदाराला पुन्हा वर्षाकाठी सव्वाकोटी रुपये दिले जात असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे महापालिका ५३ कोटी रुपये मोजणार आहे. आतापर्यंत मोजलेल्या १५ कोटींच्या कामाचा हिशेबही महापालिका आणि अग्निशामक दलाकडे नाही.

या यंत्रणेची उपयुक्तता पाहता, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक वाहन असणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, असे महापौरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, गेल्या वर्षी पुरेशी तरतूद न मिळाल्याने आता स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून महापौरांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकारी पावले उचलत आहेत. नव्या वाहनांच्या खरेदीसह त्यांच्या देखभालीचा खर्च ८१ कोटी रुपये असेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT