पुणे

नागठाणे अर्थसंकल्प चर्चा

CD

विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

डॉ. विजय कुंभार; अर्थसंकल्पावरील चर्चेत मान्यवरांचा सहभाग

सातारा, ता. ५ : केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासयोजना परिणामकारकपणे राबवण्यात येत आहेत. मात्र, हा विकास तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत अर्थसंकल्पातील योजनांना पूर्णत्व येणार नाही, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांनी व्यक्त केले.
आम्ही पुस्तकप्रेमी समूह, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. पुस्तकप्रेमी समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री, अर्थतज्ज्ञ श्रीराम नानल, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर, विनायक भोसले आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कुंभार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच सरकारांनी देशाचा विकास करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी अजूनही त्याची फळे पूर्णपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. जागतिक अर्थव्यवस्थांची तुलना करता भारतातील दारिद्र्य अद्यापही कमी झाले नाही. शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणार नाही. देशातील शेतकऱ्याला जोपर्यंत आपल्या उत्पादनांची किंमत ठरवण्याचा अधिकार मिळणार नाही, तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही.’’
मुकुंद फडके यांनी अर्थसंकल्पातील करविषयक सवलतींची माहिती दिली. श्रीराम नानल यांनी अर्थसंकल्पातील विषयांचा आढावा घेतला. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. श्रीकांत कात्रे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र ओळी
26B08126
सातारा : डॉ. विजय कुंभार यांचा सत्कार करताना डॉ. संदीप श्रोत्री. त्या वेळी मुकुंद फडके, श्रीराम नानल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT