Development should be given more importance than allegations Ajit Pawar devendra fadanvis pune  sakal
पुणे

आरोप प्रत्यारोपापेक्षा विकासाला महत्त्व द्यावे-अजित पवार

पवार म्हणाले जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे

बाबा तारे

औंध : 'जनतेला आता एकमेकांवर होणारे आरोप ऐकण्यात अजिबात रस नाही.जनतेचे पायाभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे परंतु जनतेच्या समस्या सोडवणे बाजूला राहते व आरोप प्रत्यारोप केले जातात.याला माध्यमांनीही महत्व न देता सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे'. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.सूस(ता.मुळशी) येथील विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात आली याविषयी पत्रकारांनी विचारले असता 'अशा प्रकारे नोटीसा देणे, विविध यंत्रणांचा वापर करणे राज्यात व देशात हि स्थिती कधीही नव्हती.कुठलेही वक्तव्य करताना प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. याबाबत मी स्वतः पंतप्रधानांच्या समोर देखील याबाबतीत थोडेबहुत वक्तव्य केले होते.तसेच प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे.' असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांची आम्ही नेहमीच आठवण करतो.त्यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यात सत्तेत व जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी कसे काम केले पाहिजे,कसे वागले पाहिजे,कसे बोलले पाहिजे, सर्वांना घेऊन कसे बरोबर घेऊन गेले पाहिजे याचे स्मरण करतोच परंतु हे सर्वच स्तरावरून झाले पाहिजे. जनतेचे प्रश्न सुटावेत हा प्रयत्न झाला पाहिजे परंतु जनतेचे प्रश्न राहतात बाजूला व प्रत्येक वेळेस वेगवेगळे वक्तव्य केले जातात.यात कृपया वेळ घालवू नये हे सर्वांनी मिळून हे बंद केले पाहिजे व विकासाला महत्त्व दिले पाहिजे.यातून राज्याचा व‌ देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT