पुणे

पालिकेतर्फे दोन उद्यानांचा विकास

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण केले जात आहे. 

पालिकेच्या उद्यान-स्थापत्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबई येथील ‘लिनियर गार्डन’च्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी २० लाख ८० हजार ६५७ रुपयांची निविदा आहे. पहिल्या टप्प्यात गालिचांची निर्मिती केली आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘हॅरी पॉटर हाऊस’, ‘संगीतमय कारंजे’ असणार आहे. 

पिंपळे सौदागर येथील शिवार चौकाजवळील ५ एकर जागेत ३ कोटी ७१ लाख रुपये खर्चून उद्यानाचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात वृक्ष लागवड आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. पिंपळे निलख येथील बाणेर पूल कॉर्नरजवळ साडेतीन एकरवर नवीन उद्यान विकसित केले जात आहे. त्यासाठी ३ कोटी ८० लाखांचा खर्च येणार आहे.

पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख येथे प्रत्येकी एका उद्यानाचे काम सुरू आहे. पुढील आर्थिक वर्षात काळाखडक भागातील अडीच एकर जागेवर उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे.
- मनोज सेठीया,  कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : RSS पथसंचलनात सहभागी झाल्याने दोन शिक्षक निलंबित; एच. डी. कुमारस्वामींचा सरकारला सवाल

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT