Sunetra Pawar Sakal
पुणे

विकासकामांबाबत बारामतीकरांनी सहकार्य करावे; सुनेत्रा पवार

विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून होत आहे.

- मिलिंद संगई

बारामती - विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून होत आहे, बारामतीकरांनीही या विकासकामांबाबत सहकार्य करावे असे आवाहन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.

उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांच्या प्रभाग क्रमांक तीन मधील 5 कोटी 58 लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकांचे भूमीपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यात त्रिमूर्तीनगर मधील अंतर्गत रस्ते, छत्रपती संभाजी महाराज मार्ग एकात्मिक पध्दतीने विकसित करणे, त्रिमूर्तीनगरमधील अंतर्गत रस्ते, आहुजा बिल्डींग ते आगवणे घर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतर्गत रस्ते, कांचननगरमधील रस्ते, बापू शेरे घर ते बापू ठोंबरे घर रस्ता, भाई कोतवाल सोसायटी सामाजिक सभागृह उभारणी या कामांचा समावेश आहे.

उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव व नगरसेविका नीलीमा मलगुंडे यांनी स्वागत केले. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक राजेंद्र बनकर, बिरजू मांढरे, सुधीर पानसरे, मुख्याधिकारी महेश रोकडे, दीपक मलगुंडे, बबलू जगताप, अभिजीत चव्हाण, कुणाल गालिंदे, नीलिमा मलगुंडे, अनिता जगताप, मयुरी शिंदे, सुहासिनी सातव ,नीता चव्हाण, अतुल बालगुडे, अमर धुमाळ, अमजद बागवान आदी उपस्थित होते.

या प्रसंगी किरण गुजर यांनी मनोगतात विविध विकासकामांचा आढावा घेतला. सुनेत्रा पवार यांनी नागरिकांनीही विकासकामांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज बोलून दाखवली.

सूत्रसंचालन बागवान सर यांनी केले, प्रस्ताविक सूर्यवंशी यांनी केले.

फोटो- बारामती- शहरातील प्रभाग तीन मधील विकासकामांचे भूमीपूजन करताना सुनेत्रा पवार, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, किरण गुजर व इतर मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT