Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  
पुणे

Devendra Fadnavis : "माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला तरी..." ; शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पुन्हा बोलले

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis : कसबा-चिंचवड पोटनिवडुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत देखील विधान केले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी एवढेच सांगेल की मी बोललो ते सत्य बोललो त्याचे वेग वेगळे अर्थ तुम्ही काढले. शांत ऐका त्याची कडी तुम्हाला जोडता येईल. दुसऱ्या पुराव्याची गरज पडणार नाही. मी अर्ध बोललो आहे उरलेलं वेळ आल्यावर बोलेल.

"तेव्हा मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी अभिमन्यूकडून आपण अनेक गोष्टी शिकलो आहोत. तो चक्रव्यूह कसा तोडायचा हे आम्ही केलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकार स्थापन केले आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात गिरीश बापट यांची देखील भेट घेतली. यावर फडणवीस म्हणाले, "बापट साहेब आमचे नेते आहेत आज ही भेट घेतली. त्यांची प्रकृती चांगली वाटली यात मला आनंद आहे. त्यांना कसब्याची काळजी आहे. त्यांनी प्रचारासंदर्भात मला टिप्स दिल्या आहेत. बापट यांचे बारीक लक्ष या निवडणुकीकडे आहे. मला वाटतंय कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल" 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT