Loksabha Election 2024 
पुणे

Loksabha Election 2024: "जिथं मित्रपक्ष लढतील तिथं...";  लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन

Sandip Kapde

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. तसेच आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही तर देशासाठी महत्वाची आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सगळ्या मतदारसंघात आणि सगळ्या बुथवर भाजप मजबूत करायची आहे. जिथे मित्रपक्ष लढतील तिथं त्यांच्या पाठिमागे आपल्याला उभं राहायचं आहे. ही निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्वाची आहे. कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेलं आहे. त्यामुळे २०२४ ते २०२९ हा काळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. यासाठी सर्वांनी ध्येय समोर ठेऊन काम करावं."

भारत विश्वचषक हारला कारण तेथे नरेंद्र मोदी आले होते. त्यामुळे पनवती लागली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

"नरेंद्र मोदी यांच्यामुळे भ्रष्टाचारी लोक भयभीत आहेत. त्यामुळे त्यांना मोदींबाबत तसं वाटत असेल. मात्र सामान्य लोकांसाठी नरेंद्र मोदी मसीहा आहेत. मोदीजी देशाचे रक्षक आहेत. राहुल गांधी यांना त्यांचा पक्ष देखील गांभीर्याने घेत नाही. लोक देखील त्यांना गांभीर्याने घेत नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT