पुणे

पुणे - लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर देवगड हापूसच्या आवकेला प्रारंभ

CD

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर
देवगड हापूसच्या आवकेला प्रारंभ

देवगड, रत्नागिरीतून हंगामपूर्व आठ पेट्यांची आवक

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस आंब्याची हंगामातील पहिली आवक लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर रविवारी (ता. ८) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात झाली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हापूस आंब्याच्या पेट्यांचे आगमन झाल्याने व्यापारी आणि फळ बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि रत्नागिरी भागातून ही हंगामपूर्व आवक झाली. बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांच्या हस्ते आंब्याच्या पेट्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी उपसभापती नानासाहेब आबनावे, सचिव दिनेशसिंग चंदेल, संचालक अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले, मिलिंद हरगुडे, फळे व भाजीपाला विभागाचे प्रमुख नितीन चौरे, श्री शारदा गजानन आडते असोसिएशनचे अध्यक्ष अमोल घुले, उपाध्यक्ष युवराज काची, सचिव राहुल कोंढरे, बलराज माजलगावे, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहन जाधव, महेश शिर्के, संतोष कुंभारकर, सागर केदारी आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बाजारात कुळेशी (जि. रत्नागिरी) येथील शेतकरी तानाजी तांबे, कातवण (ता. देवगड) येथील शेतकरी आशिष तर्फे आणि पडेल (ता. देवगड) येथील वीरेंद्र कांबळे यांच्या बागेतील आंब्याच्या पेट्यांचा समावेश होता. ही आवक हंगामपूर्व फळांची आहे. जून महिन्यात आलेल्या मोहोराचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे चांगली फळे लागली आहेत. हा आंबा चांगल्या दर्जाचा असून, पिकल्यानंतर खाण्यासही चवदार आहे. आंब्याचा नियमित आणि मुख्य हंगाम मात्र मार्च महिन्यापासून सुरू होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

कोट ----
पुणे बाजार समितीत आंब्याची मोठी उलाढाल होते. यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, या दृष्टीने बाजार समितीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
- प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हंगामातील पहिली आवक आमच्या गाळ्यावर झाली. ही आवक पूर्वहंगामी असली, तरी हवामानाने साथ दिल्यास यंदाचा हंगाम चांगला होईल, अशी आशा आहे.
- अनिरुद्ध भोसले, संचालक, बाजार समिती, पुणे

फोटो ओळ :
पुणे ः बाजार समितीमध्ये देवगड येथून आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीचे रविवारी (ता. ८) पूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

SCROLL FOR NEXT