devidas darekar over kalmodi dam water to satgaon village dimbhe dam tunnel work protest politics sakal
पुणे

Pune : कलमोडी धरणातील पाणी सातगाव पठारला मिळावे व डिंभे धरणातील बोगद्याचे काम रद्द व्हावे - देविदास दरेकर

आंदोलनाच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

डी के वळसे पाटील

मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ पेठ तालुका आंबेगाव येथे मंगळवारी तारीख 18 रोजी कल मोडी धरणाचे पाणी सातगाव पठारला मिळावे व डिंभे धरणातील नियोजित बोगद्याचे काम रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषद माजी गटनेते देविदास दरेकर यांचे नेतृत्वाखाली भर पावसात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

हा प्रश्न मार्गी न लागल्यास गनिमी काव्याची पद्धत वापरून पोलीस व शासकीय यंत्रणेला पूर्व सूचना न देता कलमोडी व डीभे धरणाच्या पाण्यात शेतकरी उड्या मारतील असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

आंदोलनाच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे नाशिक रस्त्यावर पेठ चौकातच शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या.

आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल एक तास आंदोलकांनी आपल्या व्यथा येथे मांडल्या. भाऊसाहेब सावंत पाटील, रवींद्र तोतरे,अशोक धुमाळ गणपतराव कराळे यांनी आंदोलकाच्या वतीने सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या.

रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे तगडा बंदोबस्त होता आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलन शांततेत पार पडले.

सविस्तर वृत्त लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT